January 31, 2019
अभी नही तो कभी नही, बदलेल तुमची भाग्यरेषा
विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार!
Dyanjyoti Free Learning University मध्ये तुमचं स्वागत आहे.
मित्रांनो स्पर्धा परीक्षा क्षेत्रात हजारो व्यक्ती आणि संस्था आपआपल्या फायद्यासाठी कार्यरत आहेत. प्रत्येकजण तुम्हाला आपल्या जाहिरातीच्या माध्यमातून attract करण्याचा प्रयत्न करतो. कुणाला स्वतःचा क्लास चालवायचाय तर कुणाला आपली पुस्तक विकायची आहेत. जाहिरात करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे.
परंतु मित्रांनो कधी हा विचार केलाय का कि अक्षरशः लाखो उमेदवार वेगवेगळा क्लास करतात पण त्यातील ९९% उमेदवार का अपयशी होतात? बाजारात मिळणारी सर्व पुस्तके सर्वचजण वाचतात तरीही ९९% पेक्षाही जास्त मुलं अपयशी का होतात?
क्लास वाल्यांचा क्लास चालतो, पुस्तक वाल्यांची पुस्तके खपतात त्यांना लाखो करोडो मिळतात. पण या सगळ्यात माझ्या विद्यार्थी मित्रांना काय मिळते? हताशा आणि नैराश्य?
पण, विद्यार्थी मित्रांनो, अंधाराला चिरणारा प्रकाश असतोच. तसेच याही अंधाऱ्या परिस्तिथीत आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी ज्ञानज्योती आपल्या सेवेत आहे.
ज्ञानज्योती तुम्हाला क्लास लावायला सांगत नाही आहे. नाही, तुम्हाला कुठले पुस्तकं खरेदी करायला. ज्ञानज्योती तुम्हाला काही मागत नाही तर ज्ञानज्योती तुम्हाला काही देत आहे.
ज्ञानज्योती तुम्हाला जे देणार आहे ते तुम्हाला लाखो रुपये फी देऊनही कुठे मिळणार नाही याची आम्हाला खात्री आहे. तुम्हास स्पर्धापरीक्षांच्या माध्यमातून यशस्वी प्रशासकीय अधिकारी घडविण्याचा संकल्प ज्ञानज्योती करते आहे. असा प्रशासकीय अधिकारी जो सध्या सुरु असलेल्या बाजार व्यवस्थेत तुम्हाला शोधूनही सापडणार नाही.
मित्रांनो मेहनती, प्रामाणिक, स्वाभिमाणी आणि अत्यंत कुशल प्रशासकीय अधिकारी/कर्मचारीच या देशाचं भविष्य उज्वल करू शकतात असा ज्ञानज्योतीला विश्वास आहे. म्हणून ज्ञानज्योती तुम्हाला नव्हे तर देशाला उज्वल भविष्य देण्यासाठी तुमच्या माध्यमातून राबणार आहे. प्रत्यक्ष कामातून प्रशिक्षण, उच्च ध्येय निष्ठा आणि सातत्यपूर्ण प्रामाणिक प्रयत्नातून आम्ही हा प्रकल्प साकारतोय. तुम्हीही या आणि सामील व्हा. स्वतःचे आणि देशाचे भविष्य उज्वल करा. या प्रकल्पासाठी तुम्हला प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी घडविण्यासाठी ज्ञानज्योती कटिबद्ध आहे. परंतु त्यासाठी ज्ञानज्योती तुमच्याकडून एक नवा रुपयासुद्धा घेणार आंही आहे. मी स्वतः अनेक हाल-अपेष्टा भोगून कष्ट करून प्रशासकीय अधिकारी झालो आहे. त्यामुळे तुमच्या उज्वल भविष्यासाठी तुम्हाला कोणतीही फी भरण्यास ज्ञानज्योती तुम्हाला सांगत नाही.
तुम्ही कोणीही फी न भारतही ज्ञानज्योती तुम्हाला एक यशस्वी प्रशासकीय अधिकारी कसा बनवणार आहे? काही idea आहे का आपल्याला? नाही ना? पण बनवणार आहे हे नक्की. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक्ष भेटून किंवा फोन करून सगळी योजना समजून घ्यावी लागणार आहे. अनेक शासकीय अधिकारी, संस्था आणि समाजातील सन्माननीय व्यक्तींचे सहकार्य आम्ही घेणार आहे.
जय हिंद! जय महाराष्ट्र!