विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर
दरडोई उत्पादनात कर्नाटक, तेलंगणानंतर महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर कायम असल्याचे अहवालात नमूद
आर्थिक पाहणी अहवालात काय?
▪ मागील वर्षीच्या दुष्काळामुळे राज्यातील पीक उत्पादनात 8 टक्के घट अपेक्षित
▪ राज्याच्या कृषी आणि संलग्न कार्य क्षेत्रात 2.7 टक्क्यांची घट अपेक्षित
▪ गेल्या वर्षी कृषी आणि संलग्न कार्य क्षेत्राचा वृद्धीदर 3.1 टक्के होता, यावर्षी तो कमी होऊन 0.4 टक्क्यांवर येईल असा अंदाज
▪ राज्याच्या उद्योग क्षेत्रातही 0.7 टक्क्यांची घट अपेक्षित आहे
▪ सेवा क्षेत्राचा वृद्धीदर मात्र गेल्या वर्षीच्या 8.1 टक्क्यांवरुन 9.2 टक्के वाढणे अपेक्षित आहे
▪ यंदाही आर्थिक पाहणी अहवालात सिंचनाची टक्केवारी उपलब्ध नसल्याचा उल्लेख आहे.
राज्याचा विकासदर 7.5 टक्के इतका राहणार असून गेल्या वर्षीही हा विकास दर 7.5 टक्केच होता.