एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ।

एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ।

महाराष्ट्राच्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रात कार्यरत व्यक्ती आणि संस्थांचे मनापासून स्वागत !!! आणि दीपावली सणाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

मित्रांनो  स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र इतर कुठल्याही क्षेत्रापेक्षा वेगळे आहे. कारण देशाच्या आणि राज्याच्या प्रशासनात कोणी जावे हे ठरवणारे हे क्षेत्र आहे आणि म्हणूनच स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात चांगल्या व्यक्ती आणि संस्थांनी कार्यरत राहणे समाजहिताच्या दृष्टीने गरजेचे आहे.

परंतु परिस्थिती अशी नाही हे सत्य आहे. भांडवलाचा अभाव, मार्केटिंग कौशल्याच्या अभाव इत्यादी कारणांमुळे या क्षेत्रात कार्यरत अनेक व्यक्ती आणि संस्थांना हवे तसे स्वतःचे कतृत्व दाखवता आले नाही. करणे खूप आहेत पण सध्याच्या परिस्थितीत फरक पडायचा असल्यास समविचारी सर्व व्यक्ती आणि संस्थांनी सहकार्याने कार्य करणे गरजेचे आहे. म्हणूनच मी यासाठी पुढाकार घ्यायचे ठरवले आहे. आपल्या पैकी कोणीही स्वयंपूर्ण नाही, परंतु सहकार्याने केल्यास आपण स्वयंपूर्ण होऊ शकतो असा मला विश्वास आहे. त्यासाठी आपल्या सर्वांनी  एकत्र येणे, विचारविनिमय करणे आणि पुढची दिशा ठरवून कमला लागणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण आपली माहिती आणि मत 9975806127 या व्हाट्सअप नंबर वर पाठवावी ही  नम्र विनंती.

लवकरच भेटून आपण सर्वजण यशस्वी वाटचाल करू असा मला विश्वास आहे.

धन्यवाद !!!

आपला 
डॉ. श्री विशाल म  भेदूरकर 
वित्त व लेखा  अधिकारी
Please follow and like us:

Leave a Reply