Facebook
Youtube
Telegram
Close

June 13, 2019

चालु घडामोडी वन लाईनर्स, १३ जून २०१९

● १३ जून : आंतरराष्ट्रीय वर्णहीनता जागृती दिवस

● संकल्पना २०१९ : “Still Standing Strong”

● इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पीस या संस्थेेने जागतिक शांतता निर्देशांक २०१९ जारी केला

● जागतिक शांतता निर्देशांक २०१९ मध्ये १६३ देशांचा समावेश करण्यात आला

● जागतिक शांतता निर्देशांक २०१९ मध्ये आइसलँड अव्वल स्थानी विराजमान

● जागतिक शांतता निर्देशांक २०१९ मध्ये भारत १४१ व्या स्थानावर आहे

● जागतिक शांतता निर्देशांक २०१९ मध्ये चीन ११० व्या स्थानावर आहे

● जागतिक शांतता निर्देशांक २०१९ मध्ये भुटान १५ व्या स्थानावर आहे

● जागतिक शांतता निर्देशांक २०१९ मध्ये पाकिस्तान १५३ व्या स्थानावर आहे

● जागतिक शांतता निर्देशांक २०१९ मध्ये बांगलादेश १०१ व्या स्थानावर आहे

● जागतिक शांतता निर्देशांक २०१९ मध्ये श्रीलंका ७२ व्या स्थानावर आहे

● जागतिक शांतता निर्देशांक २०१९ मध्ये नेपाळ ७६ व्या स्थानावर आहे

● जागतिक शांतता निर्देशांक २०१९ मध्ये जगातील सर्वात अशांत देश अफगाणिस्तान ठरला.

● संरक्षण संशोधन व विकास संस्थेने भारताच्या मानवरहित स्क्रॅमजेट विमानाची यशस्वीपणे चाचणी घेतली

● ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये भारतात तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक मेट्रो धावणार आहेत

● बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदाच्या शर्यतीत रघुराम राजन यांचं नाव आघाडीवर

● सामाजिक कार्यात बहुमोल कामगिरी केल्याबद्दल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना यंदाचा ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ जाहीर

● भारताच्या उत्तर-पुर्व भागात असलेल्या राज्यांमध्ये जापान 13 हजार कोटींची गुंतवणूक करणार

पीयूष गोयल यांची राज्यसभेतील भाजपच्या उपनेतेपदी निवड करण्यात आली

● संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेमध्ये भारताने पॅलेस्टाइन संस्थेविरोधात इस्त्रायलच्या बाजूने मतदान केले

● मेलबर्नमधील १० वा भारतीय चित्रपट महोत्सव ऑगस्ट ०८ ते १७ दरम्यान आयोजित करण्यात येणार

● मेलबर्नमधील १० व्या भारतीय चित्रपट महोत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणून शाहरुख खान यांची निवड करण्यात आली

एस के कैमल यांची कर्नाटक अँटीबायोटिक्स फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली

● ज्येष्ठ पत्रकार राजनाथ सिंह यांचे नुकतेच निधन झाले

कासिम-जोमर्ट तोकायेव्ह यांनी कझाखस्तानचे नवीन राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली

● आंध्र प्रदेश विधानसभा अध्यक्ष म्हणून तम्मिनेनी सीताराम यांची नियुक्ती करण्यात आली

शिवकुमारन के एम यांनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) येथे निदेशक म्हणून पदभार स्वीकारला

● पंतप्रधान नरेंद्र मोदी आज २ दिवसीय किर्गिस्तान दौऱ्यावर रवाना झाले

● पंतप्रधान नरेंद्र मोदी किर्गिस्तान येथे आयोजित शांघाय सहकार संघटनेच्या बैठकीला उपस्थित राहतील

इक्वाडोरने समलिंगी विवाहाला कायदेशीर रीत्या मान्यता दिली

● मलेशियन ली चोंग वी ने बॅडमिंटनमधून निवृत्तीची घोषणा केली

● मुस्लिम मुलींसाठी मोफत यूपीएससी, बँकिंग व राज्यसेवा परीक्षा प्रशिक्षण : केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी

● भारत व किर्गिस्तान दरम्यान झालेल्या कायदेशीर मेट्रॉलॉजीच्या क्षेत्रातील कराराला कॅबिनेटने मंजूरी दिली

● २०१८ मध्ये भारतात ४२ बिलियन डॉलर्स थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) झाली : यूएन अहवाल

● जागतिक परदेशी थेट गुंतवणूकीचा प्रवाह (एफडीआय) २०१८ मध्ये १३% कमी झाला

● चीन जगातील सर्वात मोठा इंटरनेट वापरकर्ता देश : अहवाल

● भारत जगातील दुसरा सर्वात मोठा इंटरनेट वापरकर्ता देश : अहवाल

● झोमाटो कंपनीने त्याचे पहिले भोजन वितरण ड्रोन यशस्वीरित्या परीक्षण केले

● एप्रिल २०१९ मध्ये औद्योगिक उत्पादनात ३.४ टक्क्यांची वाढ झाली

● आरबीआयने एटीएम किंमतीचे पुनरावलोकन करण्यासाठी व्हीजी कन्नन यांच्या नेतृत्वाखाली ६ सदस्यीय समितीची स्थापना केली

बिहार सरकारने आपल्या वृद्ध पालकांना सोडून देणार्या मुलांना दंड देण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली

● ऍथलेटिक्स फेडरेशनचे आंतरराष्ट्रीय संघटनेचे नाव बदलून आता “जागतिक ऍथलेटिक्स” करण्यात आले

● २०२४ पर्यंत सर्वांना स्वच्छ पेयजल प्रदान करण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे

● एलपीजी मार्केटिंगचे पुनरावलोकन करण्यासाठी किरीट परीख यांच्या नेतृत्वाखालील समितीची स्थापना करण्यात आली

● २०१८ सालचा ज्ञानपीठ पुरस्कार इंग्रजी लेखक अमिताव घोष यांना प्रदान करण्यात आला

● अमेरिकन दूतावासाकडून अमेरिकेत अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांसाठी ‘EducationUSA’ app लॉन्च करण्यात आले

● कॅबिनेटने जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट महिन्यांसाठी वाढविली

समुद्री माहिती सामायिकरण कार्यशाळा २०१९ गुरुग्राम येथे आयोजित करण्यात आली

● मे २०१९ मध्ये किरकोळ महागाईचा दर ३.०५% पर्यंत वाढला .

दिनविशेष

जागतिक बालमजुरी विरोधी दिन 2019 (12 जून) याची संकल्पना – चिल्ड्रेन शुडन्ट वर्क इन फील्ड्स, बट ऑन ड्रीम्स!

आंतरराष्ट्रीय

  • ‘ब्रॅंड्झ टॉप 100 मोस्ट व्हॅल्यूएबल ग्लोबल ब्रँड्स 2019’ या यादीत प्रथम क्रमांक – अॅमेझॉन.
  • 2021 सालापासून उत्तर अमेरिका उपखंडातल्या या देशात प्लास्टिकबंदी असणार – कॅनडा.

राष्ट्रीय

‘ब्रॅंड्झ टॉप 100 मोस्ट व्हॅल्यूएबल ग्लोबल ब्रँड्स 2019’ या यादीत स्थान मिळविणार्‍या भारतीय कंपन्या – HDFC बँक (60)LIC (68) आणि टाटा कन्सल्टंसी सर्विसेस (97).

व्यक्ती विशेष

  • पंतप्रधानांचे  नवे अतिरिक्त प्रधान सचिव – पी. के. मिश्रा.
  • 9 जूनपासून भारत सरकारचे प्रभारी केंद्रीय दक्षता आयुक्त – शरद कुमार.

सामान्य ज्ञान

  • आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) – स्थापना वर्ष: सन 1919; मुख्यालय: जिनेव्हा, स्वित्झर्लंड.
  • ATM – ऑटोमेटेड टेलर मशीन.
  • कॅनडा – राजधानी: ओटावा; राष्ट्रीय चलन: कॅनेडियन डॉलर.
  • भारत सरकारचे केंद्रीय दक्षता आयोग (CVC) याचे स्थापना वर्ष – सन 1964.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *