चालू घडामोडी – 11/12/2019

चालू घडामोडी – 11/12/2019

जागतिक उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक समिती (WADA) ने सर्व आंतरराष्ट्रीय क्रिडास्पर्धांसाठी रशियावर चार वर्षांची बंदी घातली

सरकारपुरस्कृत उत्तेजक चाचणी प्रकरणामुळे जागतिक उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक समितीने (WADA) सर्व आंतरराष्ट्रीय क्रिडास्पर्धांसाठी रशियावर चार वर्षांची बंदी घातली आहे, ज्यामध्ये येत्या 2020 टोकियो ऑलंपिक आणि 2022 कतार फुटबॉल विश्वचषक या स्पर्धांचा देखील समावेश आहे.याशिवाय, रशिया हिवाळी ऑलंपिक आणि पॅरालंपिकमध्येही सहभाग घेऊ शकणार नाही.

WADA ने स्पष्ट केले की, रशियावर असे आरोप होते की ते ‘उत्तेजक चाचणी’साठी आपल्या खेळाडूंचे चुकीचे नमुने पाठवत आहेत आणि तपासातही हे सिद्ध झाले की, रशियाने नमून्यांमध्ये छेडछाड केली आहे.आता WADAच्या नियमांनुसार, रशियातले जे खेळाडू उत्तेजक चाचणीमध्ये दोषी आढळले नाहीत, ते न्यूट्रल खेळाडू म्हणून स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. म्हणजेच या बंदीमुळे स्पर्धेत रशियाच्या खेळाडूंना रशियाच्या ध्वजांतर्गत सहभागी होता येणार नाही. तसेच खेळाडूंना जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही सहभागी होता येणार नाही.

जागतिक उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक समिती (WADA) बद्दल अधिक माहिती:

जागतिक उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक समिती (WADA) ही आंतरराष्ट्रीय ऑलंपिक समिती (IOC) कडून स्थापना करण्यात आलेली संस्था आहे, ज्याचे मुख्यालय मॉन्ट्रियल (कॅनडा) येथे असून ती क्रिडा क्षेत्रात घडणार्‍या उत्तेजक द्रव्यांच्या सेवनाला आळा घालण्यासाठी कार्यरत आहे. त्याची स्थापना 10 नोव्हेंबर 1999 रोजी डिक पाउंड आणि त्याचे विद्यमान अध्यक्ष क्रेग रीडे यांनी केली.

WADA: WORLD ANTI-DOPING AGENCY

मंत्रिमंडळ निर्णय

 1. राज्यातील दुय्यम न्यायालयातील 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा नंतर नियुक्त झालेल्या न्यायिक अधिकाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यास मान्यता.
 2. महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत वाढ करून 5 हजार 350 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता.
 3. महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी अतिरिक्त 3500 कोटी रुपये निधी भागभांडवल म्हणून देण्याचा निर्णय.
 4. महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या विविध वित्तीय करारांना मुद्रांक शुल्क माफी.
 5. गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतुकीस प्रभावीपणे आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या कोणत्याही महसुली अधिकाऱ्यास आता अधिकार. अध्यादेशाचे अधिनियमात रुपांतर करण्यास मान्यता.

मानव विकास निर्देशांक 2019

जारी करणारी संस्था – UNDP (UNITED NATIONS DEVELOPMENT PROGRAM )

HDI मोजण्याचे निकष – 

 1. दीर्घ आणि निरोगी जीवन
 2. ज्ञानाची सुगमता
 3. योग्य राहणीमान

भारताचा क्रमांक – 188 देशांच्या यादीत 129 वा (2018 साली 130 वा)

भारताचा HDI – 0.647 

भारताचा समावेश – मध्यम मानव विकास गटात

2019 च्या HDI नुसार प्रथम 5 देश

 1. नॉर्वे (HDI – 0.954)
 2. स्वित्झर्लंड (HDI – 0.946)
 3. आयर्लंड (HDI – 0.942)
 4. जर्मनी (HDI – 0.939)
 5. हँगकाँग (HDI – 0.939)

भारताच्या शेजारील राष्ट्रे व त्यांचा HDI नुसार क्रमांक

 1. नेपाळ 147
 2. पाकिस्तान 152
 3. बांग्लादेश 135
 4. श्रीलंका 71

HDI नुसार जगातील शेवटची राष्ट्र 

 1. नायजर – 189 वा
 2. मध्य आफ्रिकन रिपब्लिक – 188 वा
 3. चाड – 187 वा
 4. दक्षिण सुदान – 186 वा
 5. बुरुंडी – 185 वा
Please follow and like us:

Leave a Reply