चालू घडामोडी – 15/12/2019

चालू घडामोडी – 15/12/2019

ओडिशा राज्य सरकारने ‘वर्ल्ड हॅबिटॅट अवॉर्ड 2019’ हा पुरस्कार जिंकला

– संयुक्त राष्ट्रसंघ-अधिवास (UN-Habitat) या संघटनेच्या संयुक्त विद्यमाने ब्रिटनच्या वर्ल्ड हॅबिटॅट या संस्थेच्यावतीने ओडिशा राज्य सरकारला त्यांचा 2019 सालासाठीचा ‘वर्ल्ड हॅबिटॅट अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले.

– हा पुरस्कार ओडिशा सरकारच्या “जगा मिशन” नावाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी देण्यात आला आहे. राज्य सरकारने या उपक्रमाच्या माध्यमातून दरिद्री लोकांचे शहरी जीवनमान उंचावण्याचा मार्ग जगाला दाखविलेला आहे.

– ओडिशा सरकारच्या “जगा मिशन” या पुढाकाराच्या अंतर्गत कायद्याद्वारे जमिनीचा हक्क देणे आणि झोपडपट्टी कमी करणे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे पायाभूत सुविधा आणि सेवांमध्ये सुधारणा दिसून आली आणि रोजगाराच्या संधींमध्ये देखील वाढ झालेली आहे.

UN-अधिवास बाबत 

– संयुक्त राष्ट्रसंघ-अधिवास  म्हणजेच मानवी वसाहत आणि शाश्वत शहरी विकासासाठी समर्पित असलेली संयुक्त राष्ट्रसंघाची एक संघटना आहे. 1978 साली या संघटनेची स्थापना झाली आणि त्याचे मुख्यालय नैरोबी (केनिया) येथे आहे.

Please follow and like us:

Leave a Reply