Facebook
Youtube
Telegram
Close

June 22, 2019

महाराष्ट्राचे रचनात्मक (प्राकृतिक) विभाग

1. कोकण किनारपट्टी

 • कोकणाचे भोगौलिक क्षेत्रफळ ३०,३९४ चौ. किमी. आहे.
 • कोकणाचा विस्तार उत्तरेस डहाणूपासून दक्षिणेस वेन्ग्यूर्ल्यापर्यंत पसरला आहे.
 • तसेच उत्तरेस दमनगंगा नदी ते दक्षिणेस तेरेखोल नदीपर्यंत कोकणाचा विस्तार पसरलेला आहे.
 • सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग होऊन कोकण किनारपट्टी तयार झाली.
 • कोकणाची लांबी दक्षिणोत्तर ७२० किमी. आहे.
 • पश्चिम घाटामुळे कोकणाची रुंदी सर्वत्र सारखी नाही.
 • कोकणाची सरासरी उंची ३०-६० किमी. आहे.
 • उल्हास नदीच्या खोऱ्यात कोकणाची रुंदी १०० किमी. आहे.
 • कोकणाचा सर्वसाधारण उत्तर पूर्वेकडून – पश्चिमकडे आहे.
 • कोकणाची समुद्रसपाटीपासून सरासरी उंची १५ मीटर आहे तर किनाऱ्यापासून पूर्वेकडे २५० मीटर पर्यंत वाढत जाते.
 • खलाटी : पश्चिमेकडील अरबी समुद्राच्या सखल भागाला खलाटी म्हणतात.
 • खलाटी हा भाग समुद्रसपाटीपासून कमी उंचीचा आहे.
 • वलाटी : खलाटीच्या पूर्व भागास जो डोंगराळ भट आहे त्यास वलाटी म्हणतात.
 • वलाटी या प्रदेशाची सर्वसाधारण उंची २७५ ते ३०० मीटर पर्यंत आहे.
 • जसजसे सह्याद्रीच्या पायथ्याकडे जावे तशी त्यांची उंची वाढते.
 • कोकणाची किनारपट्टी रिया प्रकारची आहे.
 • कोकणातील खाड्याचा उत्तरेकडून – दक्षिणेकडे क्रम धरमतर – राजापूर – दाभोळ – विजयदुर्ग – तेरेखोल असा आहे.
 • कोकणातील सागरी किल्ले : वसईचा किल्ला, जंजीरा, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग
 • महाराष्ट्रात एकूण ४९ बंदरे आहे.
 • कोकणातील बेटे : मुंबई, साष्टी, खांदेरी, उंदेरी, कुट्टे , जंजिरा, घारापुर, अंजनदीव.

2. सह्याद्री पर्वत

 • भारताच्या पश्चिम किनारपट्टीस सह्याद्री पर्वत समांतर पसरला आहे.
 • उत्तरेस सातमाळा डोंगर ते दक्षिणेस कन्याकुमारी पर्यंत सह्याद्रीचा विस्तार पसरला आहे.
 • सह्याद्रीची लांबी १६०० किमी. आहे त्यापैकी महाराष्ट्रात ४४० किमी. आहे.
 • कोकणाची सरासरी उंची ९१५ ते १२२० मीटर आहे.
 • महाराष्ट्रात सह्याद्रीची उंची उत्तरेकडे वाढते तर दक्षिणेकडे कमी होते.
 • सह्याद्रीचा उतार पश्चिमेकडे तीव्र आहे.
 • सह्याद्री पर्वत वैतरणासावित्री नद्यांच्या उगमाच्या क्षेत्राजवळ कंकणाकृती झालेला आहे.
 • सह्याद्री पर्वतामुळे अरबी समुद्रास मिळणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्या तसेच बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या पूर्ववाहिनी नद्यांचे जलविभाजक वेगवेगळे झाले आहे.
 • घाटमाथा : सह्याद्री पर्वताच्या व त्याच्या शिखरावर उंच व रुंद सपाट प्रदेशाला घाटमाथा म्हणतात.
 •  घाट किंवा खिंड : पर्वत रांगा जेव्हा लांबच – लांब पसरलेल्या असतात तेव्हा त्या उंच, लांब रांगेमध्ये कमी उंचीचा भाग असतो अशा कमी उंचीच्या भागास खिंड म्हणतात.

सह्याद्री पर्वतातील डोंगररांगा

अ) शंभू महादेव डोंगररांगा
 • रायेश्वरापासून शिंगणापूर पर्यंत हि डोंगररांग पसरलेली आहे.
 • या रांगेमुळे भीमा आणि कृष्णा नदीची खोरे वेगळे झाले आहेत.
 • महाराष्ट्र पठावरील दक्षिणेकडील सर्वात मोठी शंभूमहादेव डोंगररांग आहे.
 • या रांगेचा विस्तार सातारा व सांगली जिल्ह्यात पसरलेला आहे.
ब) हरिश्चंद्र बालाघाट
 • या डोंगरांगामुळे गोदावरी व भीमा नदीची खोरे वेगळी झाली आहेत.
 • या डोंगरांगाच्या पश्चिम भागास हरिश्चंद्र घाट व पूर्वभागास बालाघाट या नावाने ओळखतात.
 • हि रांग अग्नेयास वळून आंध्रप्रदेशातील हैद्राबाद पर्यंत जाते.
क) सातमाळा अजिंठा डोंगररांग
 • गोदावरी व तापी या नद्या या डोंगररांगेमुळे वेगळी झाली आहेत.
 • नाशिक जिल्ह्यात सातमाळा डोंगररांग आहे.
 • देवगिरी किल्ला, अजिंठा लेणी, या वाघूर नदीच्या वळणाच्या खडकात आहेत.

3. सातपुडा पर्वतरांग

 • या पर्वतरांगेमुळे नर्मदातापी नदीचे खोरे वेगळे झाली आहेत.
 • महाराष्ट्रात सातपुडा पर्वतात नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ हे पठार आढळते. त्यांची उंची १०३६ मी. आहे.
 • या पर्वतातील सर्वोच शिखर अस्तंभ १३२५ मीटर उंचीचे आहे.
 • गाविलगड टेकड्या अमरावती जिल्ह्यात आढळतात.
 • वैराट डोंगराची उंची ११७७ मी. तर चिखलदरा १११५ मी. आहे.
 • महाराष्ट्राच्या उत्तर सरहद्दीजवळ सातपुडा रांग पसरलेली आहे.

4. महाराष्ट्र पठार

 • सह्याद्री पर्वताच्या पूर्वेस पसरलेल्या भागास महाराष्ट्र पठार म्हणतात.
 • या पठाराचा सर्वसाधारण उतार पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे.
 • या पठाराची पूर्व पश्चिम लांबी ७५० किमी. आहे.
 • या पठाराची दक्षिणोत्तर लांबी ७०० किमी. आहे.
 • या पठाराची सर्वसाधारण उंची ४५० किमी आहे.
 • महाराष्ट्राचा ९०% भूभाग दख्खनच्या पठाराने व्यापला आहे.
 • या पठाराची निर्मिती ज्वालामुखीच्या उपद्रेकामुळे झाली.
 • लाव्हारपासून महाराष्ट्र पठार तयार झाल्याने त्यास दख्खन लाव्हा असे म्हणतात.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *