Current Affairs – 20/05/2019

Current Affairs – 20/05/2019

डेव्हिड मालपास

 • जागतिक बँकेचे १३ वे अध्यक्ष म्हणून अमेरिकेचे डेव्हिड मालपास यांची नियुक्ती करण्यात आली.
 • मालपास याआधीचे अध्यक्ष दक्षिण कोरियाचे जिम याँग किम यांची जागा घेतली.
 • (किम यांनी १ फेब्रुवारी २०१९ रोजी आपल्या कार्यकाळा अगोदर तीन वर्षे पद सोडले.)
 • मालपास यांच्या नावाची शिफारस डोनाल्ड ट्रम्प यांनी केली.
 • मालपास हे अमेरिकन सरकारच्या वित्त विभागात आंतरराष्ट्रीय सेक्रेटरी होते.
 • मालपास २०१६ मधील अमेरिकन निवडणुकीत ट्रम्प यांचे आर्थिक सल्लागार होते.
 • मालपास यांनी जी-७, जी-२०, उप अर्थमंत्री परिषद, जागतिक बँक – IMF बैठका , OECD अशा अनेक मंचावर अमेरिकेचे प्रतिनिधित्व केले.

इडाई चक्रीवादळ

 • मार्च २०१९ मध्ये दक्षिण – पूर्व आफ्रिका किनारपट्टीला ‘इडाई’ चक्रीवादळाने थैमान घातला.
 • या चक्रीवादळामुळे १००० पेक्षा अधिक लोक मृत्यू पावले.
 • माझाम्बिकच्या पूर्वेकडील हिंदी महासागरात हे चक्रीवादळ तयार झाले होते.
 • ‘इडाई ‘ चक्रीवादळाच्या आपत्तीमध्ये साहाय्य करण्यासाठी भारतीय नौदलाने दक्षिण हिंदी महासागरात सुजाता, सारथी आणि शार्दूल ही जहाजे मोझाम्बिकमधील बैरा बंदराकडे पाठवली.
 • या ‘कॅटेगरी ३’ चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका मोझाम्बिक, मलावी, मादागास्कर आणि झिम्बाबवे यांना बसला.

आनंदी देशाच्या यादीत भारत १४० वा

 • संयुक्त राष्ट्राच्या (United Nations Sustainable Development Solution Network) ने २० मार्च २०१९ रोजी World Happiness Report २०१९ प्रसिद्ध केला.
 • या यादीत भारत १५६ देशाच्या यादीत १४० आहे. (मागील वर्षी १३३ होता.)
 • हा अहवाल उत्पन्न, स्वातंत्र्य, विश्वास, निरोगी आयुर्मान, सामाजिक आधार आणि औदार्य या सहा मानकाच्या आधारे काढला जातो.

भारतात वर्ल्डक्लास उपक्रम सुरु

 • डेलॉईट या वित्तीय क्षेत्रातील प्रख्यात कंपनीने महिलांच्या सक्षमीकरणासाठी वर्ल्डक्लास उपक्रम सुरु केला.
 • शिक्षण व कौशल्य विकासाद्वारे २०३० सालापर्यंत भारतातील १० दशलक्ष मुली व महिलांना रोजगार मिळवण्यासाठी कौशल्यांचा विकास करणे या बाबींवर भर देण्यात आला.
 • या उपक्रमासाठी डेलॉईट कंपनी भारतातील कथा आणि प्रथम यासारख्या बिगर – सहकारी संख्येचे साहाय्य घेणार आहे.

अर्जेंटिनाच्या राष्ट्रपतींचा भारतीय दौरा

 • अर्जेंटिनाचे राष्ट्रपती मॉरिशियो मॅक्री यांनी १७ ते १९ फेब्रुवारी २०१९ रोजी भारताचा दौरा केला.
 • २०१९ हे भारत अर्जेंटिना देशातील राजनैतिक संबंध सुरु होण्याचे ७० वे वर्ष असल्यामुळे राष्ट्रपतींचा हा दौरा महत्वाचा ठरला.
 • या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांनी १० करारावर स्वाक्षऱ्या केल्या. (संरक्षण, पर्यटन, प्रसारण, सामग्री, औषधनिर्माण, माहिती व दूरसंचार तंत्रज्ञान, कृषी, अंटार्टिका आणि नागरी अणुसहकार्य)
 • माहिती तंत्रज्ञानासाठी भारत – अर्जेंटिना उत्कृष्ठता केंद्र स्थापन करण्यासंबंधी दोन्ही देशांदरम्यान करार झाला.
 • या दौऱ्यादरम्यान अर्जेंटिना आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या रचना करारावर स्वाक्षरी केली.
 • आंतरराष्ट्रीय सौर आघाडी रचना करारावर स्वाक्षरी करणारा अर्जेंटिना ७२ वा देश ठरला.

कुंभमेळा

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये तीन विश्वविक्रम नोंदवून अलाहाबाद येथे ४ मार्च २०१९ रोजी कुंभमेळा संपन्न झाला.

कुंभमेळ्यातील नोंदवण्यात आलेले विश्वविक्रम 

 1. सर्वाधिक गर्दी व ट्रॅफीक व्यवस्थापन
 2. सर्वात मोठी स्वच्छता व कचरा व्यवस्थापन यंत्रणा
 3. सार्वजनिक स्थळावर चित्रे रेखाटणारा सर्वात मोठा चित्रकला उपक्रम (हा उपक्रम पेंट माय सिटी योजनेअंतर्गत ७००० चित्रकारांनी प्रयागराज नगरी चित्रांनी आणि बहुरूपी आकृत्यांनी रंगवली.
Please follow and like us:

Leave a Reply