May 27, 2019
Current Affairs – 27/05/2019

ओमानच्या जोखा अलहार्थी यांना प्रतिष्ठेचा मॅन बुकर पुरस्कार

- ओमानच्या जोखा अलहार्थी या मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या अरबी लेखिका ठरले आहेत, तर त्यांच्या “सेलेस्टियल बॉडीज” या पुस्तकाला हा पुरस्कार मिळाला असून, ओमान या त्यांच्या मूळ देशात वसाहतवादानंतर झालेली स्थित्यंतरे त्यांनी या पुस्तकात चितारली आहेत.
- तसेच जोखा अलहार्थी यांनी यापूर्वीही दोन लघुकादंबऱ्या, मुलांची पुस्तके व तीन अरबी कादंबऱ्या लिहिल्या आहेत. 50000 पौंडाच्या हा पुरस्कार असून तो लेखक व भाषांतरकार यांच्यात वाटला जातो.
- जोखा अलहार्थी यांच्या पुस्तकाचे भाषांतर अमेरिकी विद्वान मर्लीन बूथ यांनी केले असून त्या ऑक्सफर्ड विद्यापीठात अरबी साहित्य शिकवतात.
किड्स राइट इंडेक्सः भारत 117 व्या स्थानावर

किड्स राइट इंडेक्स नावाच्या वार्षिक जागतिक निर्देशांकाने बाल अधिकार सुधारण्यासाठी देश किती गुंतलेला आहे आणि सुसज्ज आहे यावर आधारित देशांना स्थान दिले गेले आहे.
किड्स राइट इंडेक्समध्ये 181 देशांपैकी भारत 117 व्या स्थानावर आहे.
- आयर्लंडने क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले.
- किड्स राइट इंडेक्स
- किड्स राइट्स इंडेक्स ही किर्ड्स राइट फाऊंडेशनने इरास्मस युनिव्हर्सिटी, रॉटरडॅम या संस्थेसह याची सुरुवात केली आहे.
हा चार निर्देशांकाच्या आधारे तयार केला आहे.
- जगण्याचा अधिकार
- शिक्षणाचा अधिकार
- आरोग्याचा अधिकार
- संरक्षण अधिकार
सर्वोच्च न्यायालयात नियुक्त चार न्यायाधीशांना शपथ

सर्वोच्च न्यायालयाच्या चार नवनियुक्त न्यायाधीशांना सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी शपथ दिली. आता सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या मंजूर क्षमतेइतकी म्हणजे 31 झाली आहे.
- न्या. बी. आर. गवई, न्या. सूर्यकांत, न्या. अनिरुद्ध बोस, न्या. ए. एस. बोपन्ना यांना न्यायालय क्रमांक 1 च्या कक्षात सरन्यायाधीश गोगोई यांनी विद्यमान न्यायाधीशांच्या उपस्थितीत शपथ दिली.
- सर्वोच्च न्यायालयातील 31 न्यायाधीशात तीन महिला असून त्यात न्या. आर. बानुमती, न्या. इंदू मल्होत्रा, न्या. इंदिरा बॅनर्जी यांचा समावेश आहे.
- 2008 मध्ये सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 26 वरून 31 करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर प्रथमच न्यायालयात पूर्ण क्षमतेने न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवारी चार न्यायाधीशांच्या नेमणुकीस मान्यता दिली.
श्याम सरन यांना जपानचा द्वितीय सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार मिळाला

- माजी परराष्ट्र सचिव श्याम सरन यांना भारत आणि जपान यांच्या दरम्यान कूटनीती संबंधांना बळकटी प्रदान करणे आणि परस्पर सामंजस्यता वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी जपानचा द्वितीय सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार दिला गेला.
- सरन यांना ‘द ऑर्डर ऑफ द राईजिंग सन, गोल्ड अँड सिल्वर स्टार’ हा सन्मान दिला गेला. ‘द ऑर्डर ऑफ द राईजिंग सन’ हा जपानी सरकारचा सन्मान आहे जो राजा मैजी ह्यांनी 1875 साली सादर केला.
- जपान प्रशांत महासागर प्रदेशातला एक बेट राष्ट्र आहे. या देशाची राजधानी टोकियो हे शहर आहे आणि जपानी येन हे राष्ट्रीय चलन आहे.