Blog

Current Affairs

रामसर करार

 • २ फेब्रुवारी १९७१ रोजी इराणमधील कॅस्पियन समुद्राचा दक्षिण किनाऱ्यावर रामसर या शहरात पाणथळ प्रदेश संवर्धनासाठी हा आंतरराष्ट्रीय करार करण्यात आला.
 • डिसेंबर १९७५ पासून हा करार कार्यान्वीत झाला.
 • २ फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक पाणथळ दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
 • उद्दिष्टे: रामसर कराराचे उद्दिष्टे पाणथळ प्रदेशाचे संवर्धन आणि त्यांचा धोरणी वापर याला प्रोत्साहन देणे.

रास्ता सुरक्षा सप्ताह २०१९

 • वाहतूक नियमांबद्दल जनजागृती करणे आणि रस्ते अपघात कमी करण्याच्या उद्देशाने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ४ ते १० फेब्रुवारी २०१९ दरम्यान ‘रास्ता सुरक्षा सप्ताह’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
 • २०१९ चा हा ३० वा ‘रास्ता सुरक्षा सप्ताह ठरला.
 • या उपक्रमात देशभरातील धर्मादायी संस्था, बिगर सरकारी संस्था आणि खासगी संस्थांनी सहभाग नोंदविला.

२०१९ हे आंतरराष्ट्रीय आवर्तसारणी वर्ष

दिमित्री मेंडेलिव्ह या शास्त्रज्ञाने लावलेल्या ‘रासायनिक मूलद्रव्यांच्या आवर्तसारणीच्या शोधला १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्याने संयुक्त राष्ट्रांची आमसभा आणि ‘युनेस्को’ ने २०१९ हे ‘रासायनिक मूलद्रव्यांच्या आवर्तसारणीचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेलिना क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यामधील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रावर भारताने ‘हेलिन’ या रणगाडा भेदी मार्गदर्शित क्षेपणास्त्राची ८ फेब्रुवारी २०१९ रोजी यशस्वी चाचणी घेतली.

हेलिना

 • DRDO द्वारे विकसित स्वदेशी बनावटीचे रणगाडा – भेदी क्षेपणास्त्र
 • हेलिना हे ‘हेलिकॉप्टरमधून डागता येणारे ‘नाग’ आवृत्तीचे क्षेपणास्त्र आहे.
 • पल्ला: ५०० मीटर ते ४ किलोमीटर (जमिनीवरून)
  ७ ते १० किलोमीटर (हवेतून मारा)
 • या क्षेपणास्त्रामध्ये अत्याधुनिक ‘अवर्त्तक इमेजिंग मार्गदर्शन प्रणालि’ आहे.

वंदे मातरम एक्सप्रेस

 • ट्रेन १८ म्हणजेच वंदे मातरम भारत एक्सप्रेस या रेल्वेच्या पहिल्या प्रवासाला प्रधानमंत्री मोदी यांनी १९ फेब्रुवारी २०१९ रोजी हिरवा झेंडा दाखवला.
 • १६ डब्याच्या या रेल्वेने दिल्ली ते वाराणसी दरम्यान पहिला प्रवास केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *