Facebook
Youtube
Telegram
Close

July 2, 2019

General Knowledge Notes – 2/07/2019

‘युनएड्स‘ द्वारे शुन्य भेदभाव दिन साजरा

 • संयूक्त राष्ट्रे आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थाद्वारे दरवर्षी 1 मार्च हा दिवस शुन्य भेदभाव दिन (Zero Discrimination Day) म्हणून साजरा केला जातो.
 • शुन्य भेदभाव दिनाचे चिन्ह ‘फुलपाखरू‘ आहे.
 • वय, लिंग, लैंगिकता, राष्ट्रीयत्व, वंश, रंग, इत्यादी बाबीच्या आधारावर भेदभाव न करता प्रत्येकाच्या हक्कांना प्रोत्साहन देणे आणि ते साजरे करण्याच्या उद्देशाने हा दिन साजरा केला जातो.
 • 1 डिसेंबर 2013 रोजी जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने ‘युएनएड्स‘च्या कार्यकारी संचालकांनी बिजिंग येथे शुन्य भेदभाव दिन सुरू केला.
 • त्यानुसार 1 मार्च 2014 रोजी सर्वप्रथम हा दिन साजरा करण्यात आला.

उषा थोरात कृतीदल

 • देशाबाहेरील रूपायाच्या बाजारपेठेसंबंधी समस्येचे परिक्षण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बॅंकेने माजी उप-गव्हर्नर उषा थोरात यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय कृतीदलाची स्थापना मार्च 2019 मध्ये केली.
 • हे कृतीदल देशाबाहेरील रूपयाच्या बाजारपेठेच्या विकासामागील कारणाचे मुल्यांकण करणार आहे. तसेच स्थानिक बाजारपेठेतील रूपयाचा विनीमय दर आणि बाजारातील तरलता या गोष्टींवर देशाबाहेरील बाजारपेठेचा प्रभाव हे कृतीदल अभ्यासणार आहे.
 • स्थानिक बाजारात प्रवेश करण्याबाबत अनिवासी भारतीयांना प्रोत्याहन देण्यासाठी उपाययोजनाची शिफारस कृतीदल करणार आहे.

मनोहर पर्रीकर

 • गोव्याचे मुख्यमंत्री व माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले ते 63 वर्षाचे होते. त्याचा मृत्यू कर्करोगामूळे झाला.
 • पर्रीकर यांचा जन्म 13 डिंसेबर 1955 गोव्यातील म्हापसा येथे झाला.
 • शालेय शिक्षण लोयोला हायस्कुलमध्ये
 • 1978 मध्ये त्यांनी आयआयटी बॉम्बे येथून मेटलर्जिस्ट विषयात पदवी मिळविली.
 • पर्रीकर यांनी तारूण्यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश केला होता. RSS च्या उत्तर गोवा युनिटमध्ये ते सक्रिय होते.
 • 1988 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला 1991 मध्ये उत्तर गोवा लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदा लोकसभा लढवली मात्र पराभूत झाले.
 • 1994 मध्ये पणजी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकली. त्यानंतर सलग 4 वेळा त्या मतदार संघातून निवडून आले.
 • 2000 मध्ये पहिल्यांदा ते गोव्याचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी चार वेळा मुख्यमंत्री पद भूषवले. 2000, 2002, 2012, 2017 मध्ये
 • देशातील पहिले आयआयटी पदवीधर मुख्यमंत्री हा बहुमान पर्रीकर यांनी मिळवला.
 • नोव्हेंबर 2014 मध्ये मोदी सरकारमध्ये संरक्षण मंत्री पदावर काम केले. मार्च 2017 मध्ये संरक्षण मंत्री पदाचा राजीनामा आणि चौथ्यांदा गोवाचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरूवात.
 • मनोहर पर्रीकर हे उत्तर प्रदेशातून राज्यसभा सदस्य होते.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *