पूर्वपरीक्षा वरील पदांसाठी एकत्र घेतली जाते. मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात किंचित बदल वगळता या परीक्षांचे स्वरूप एकसारखेच असते. मंत्रालय सहाय्यक पदाला मुलाखत नसून अंतिम परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे निवड केली जाते.पोलीस उपनिरीक्षक (शारीरिक चाचणीसह) व विक्रीकर निरीक्षक यांना मुलाखतीची प्रक्रिया पार पाडावी लागते.
स्वरूप
पूर्वपरीक्षा
- पेपर 1 – सामान्य अध्ययन 100 गुण वेळ -1 तास
मुख्यपरीक्षा
- पेपर 1 – भाषा
(इंग्रजी 40 गुण मराठी 60 गुण) - पेपर 2 सामान्य अध्ययन 1 100 गुण
मुख्य परीक्षेमध्ये विक्रीकर निरीक्षक व मंत्रालयीन सहाय्यक पदासाठी पोलीस संदर्भात संगणक व माहिती तंत्रज्ञान विषया ऐवजी लेखाकर्म या विषयावर प्रश्न विचारले जातात.
पोलीस उपनिरीक्षक पदाची मुलाखत 50 गुण व शारीरिक चाचणी 100 गुणांची असते.
पदे
- पोलीस उपनिरीक्षक(PSI)
- विक्रीकर निरीक्षक (STI)
- मंत्रालयीन सहाय्यक (ASO)